बेळगाव महापौर, उपमहापौर निवड : आज मतदान | पुढारी

बेळगाव महापौर, उपमहापौर निवड : आज मतदान

बेळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा : बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवड आज होणार आहे. त्‍या पार्श्वभूमीवर सीमाभागासह महाराष्‍ट्राचेही या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. महापौर पदासाठी सारिका पाटील, शोभा सोमनाचे आणि वाणी जोशी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर उपमहापौर पदासाठी वैशाली भातकांडे यांनी अर्ज भरला आहे.

उमेदवार भगवे फेटे घालून कार्यालयात हजर झाले आहेत. महापौरपदी शोभा सोमनाचे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे. दरम्‍यान तीन वाजता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी आज सकाळी शिवाजी उद्यान येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

हेही वाचा : 

Back to top button