Mohan Bhagwat : देवापुढे कोणतीही जात- पात नाही, सर्वजण समान : मोहन भागवत | पुढारी

Mohan Bhagwat : देवापुढे कोणतीही जात- पात नाही, सर्वजण समान : मोहन भागवत

पुढारी ऑनलाईन डेस्क : देवापुढे कोणतीही जात- पात नाही. सत्य हाच ईश्वर आहे. नाव, पात्रता आणि सन्मान काहीही असले तरी सर्व समान आहेत आणि त्यात काहीही फरक नाही. काही पंडित धर्मग्रंथांच्या आधारे जे म्हणतात ते खोटे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. मुंबईत संत रोहिदास जयंती सोहळ्यात बोलताना त्यांनी जातिव्यवस्थेवर जाहीरपणे भाष्य केले.

भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले की, आमची उपजीविका म्हणजे समाजाप्रती जबाबदारीही आहे. संत रोहिदास आणि बाबासाहेबांनी समाजात एकोपा प्रस्थापित करण्याचे काम केले. संत रोहिदास हे देशाच्या आणि समाजाच्या विकासाचा मार्ग दाखवणारे होते. समाजाला बळकट आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली परंपरा त्यांनी दिली. देशातील जनतेने स्वत:च्या मनाला कोंडीत पकडले. याला अन्य कोणी जबाबदार नाही. समाजातील आत्मीयता संपली, तरच मोठा स्वार्थ होतो.

आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला. याचा फायदा घेऊन आपल्या देशात हल्ले झाले. बाहेरून आलेल्या लोकांनी फायदा घेतला. तुलसीदास, कबीर, सूरदास यांच्यापेक्षा संत रोहिदास श्रेष्ठ असून संत शिरोमणी होते. वादविवादात जरी ते ब्राह्मणांवर विजय मिळवू शकले नाहीत. पण त्यांनी लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि त्यांना विश्वास दिला की देव आहे. देशातील हिंदू समाज नष्ट होण्याची भीती आहे. ही गोष्ट तुम्हाला कोणताही पंडित सांगू शकत नाही, ती तुम्हाला स्वतःला समजून घ्यावी लागेल, असे भागवत म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button