पुणे-नगर महामार्गावर एसटी-क्रेनचा भीषण अपघात, बारा प्रवाशी जखमी

पुणे-नगर महामार्गावर एसटी-क्रेनचा भीषण अपघात, बारा प्रवाशी जखमी
Published on
Updated on

कोरेगाव भीमा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: सणसवाडी (ता. शिरुर) नजीक पुणे-नगर महामार्गावर कल्याणी चौक येथे एसटी व क्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल १२ प्रवाशी जखमी झाले. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणसवाडी येथील पुणे-नगर महामार्गाने बस (एमएच १४ बीटी २८००) अहमदनगरकडून पुण्याकडे येत होती. यावेळी कल्याणी चौकातून एसटीच्या पुढे जात असलेला क्रेन (एमएच १२ टीवाय ४५०२) चालकाने अचानक क्रेन रस्त्यावरुन उजव्या बाजूकडे वळविली. या दरम्यान अहमदनगरकडून आलेल्या एसटीची क्रेनला धडक बसून अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलिस हवालदार राजेश माने, पोलिस नाईक राकेश मळेकर, महेंद्र पाटील, पोलिस मित्र खंडेराव चकोर, बापू भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कोरेगाव भीमा येथील खासगी रुग्णालयात हलवले. या अपघातात सारिका अजित फुले (रा. सुस रोड पुणे), सुमन सुर्यकांत भोसले व जयंत सुर्यकांत भोसले (दोघे रा. कात्रज पुणे), राहुल दत्तात्रय काफे (रा. कोपरगाव अहमदनगर), अरमान अमरफारु खान (रा. शिरुर), निर्मला शिवाजी हापसे व शिवाजी देवराव हापसे (दोघे रा. राहुरी अहमदनगर), अश्विनी विशाल आवारे व विशाल सखाराम आवारे (दोघे रा. निंबूडी अहमदनगर), शोभा भारत हिवाळे (रा. नाशिक), वीरेंद्र दिनकर बनसोडे (रा. वाटेगाव) आणि शिवाजी अनिल दाभाडे (रा. शिरुर) हे सर्व १२ प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेबाबत एसटी चालक विरेद्र दिनकर बनसोडे (वय ४७, रा. वाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात खबर दिली असून शिक्रापूर पोलिसांनी सुरजकुमार अशोक कुमार (रा. कुंजहित, आजमगड देवगड उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने व पोलिस नाईक राकेश मळेकर हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news