बेळगाव दौराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर पोलीस बंदोबस्‍तात वाढवला | पुढारी

बेळगाव दौराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर पोलीस बंदोबस्‍तात वाढवला

कागल; पुढारी वृत्तसेवा :  मंत्री आणि सीमाप्रश्‍नाचे समन्वयक  चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे कर्नाटकातील बेळगाव दौऱ्यावर जाणार नसल्याची जाहीर केले होते; परंतु कर्नाटक पोलिसांनी खबरदारी म्हणून महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर दूधगंगा नदीवर आपल्या हद्दीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. महाराष्ट्र- कर्नाटक या दोन्ही राज्याचे पोलीस सीमेवर दाखल झाल्यामुळे सीमेला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे.

चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे बेळगावला जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे  सोमवारी सायंकाळीपर्यत महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता. मंगळवारी सकाळीच कर्नाटक पोलिसांच्या गाड्यांची ताफे- ताफेच्या सीमेवर दाखल झाले. यामुळे सीमाभागाला छावणीचे स्वरूप आले आहे. महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

नाशिकरोडला कोयतेधारी टोळक्याकडून महिलेचा विनयभंग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर सायंकाळी पाच वाजता येऊन आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यामुळे विजय देवणे कर्नाटकात जाणार की आंदोलन करणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : 

Back to top button