आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ धावपटू सुरेश देवरमणी यांना नेपाळ येथे तीन सुवर्णपदके | पुढारी

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ धावपटू सुरेश देवरमणी यांना नेपाळ येथे तीन सुवर्णपदके

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : उचगाव (ता. बेळगाव) व सध्या चन्नम्मानगर येथील आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ धावपटू सुरेश लक्ष्मण देवरमणी यांनी नेपाळ येथे धावणे व चालणे स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण पदके पटकावली. एस. बी. के. एफ. इंटरनॅशनल गेम्स या असोसिएशन मार्फत रंगसाला या आंतरराष्ट्रीय मैदानात 16 ते 19 नोव्हेंबर या दरम्यान झालेल्या धावणे स्पर्धेमध्ये देवरमणी यांनी उज्वल यश संपादन करत तीन सुवर्ण पदके पटकावली.

सत्तर वर्षावरील गटांमध्ये त्यांनी १० किलोमीटर, ५ किलोमीटर धावणे व ५ किलोमीटर चालणे या स्पर्धेत भाग घेऊन ३ सुवर्णपदके पटकावली. या स्पर्धेत बांग्लादेश, भारत, नेपाळ यासह अन्य देशातील ज्येष्ठ धावपटू सहभागी झाले होते.

स्मृतीचिन्ह, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आतापर्यंत त्यांनी शाळा, महाविद्यालय, तसेच राज्य, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन शेकडो पदके प्राप्त केली आहेत. देवरमणी हे भारतीय सैन्य दलाच्या बेळगाव येथील डिफेन्स अकाउंटस डिपार्टमेंट मधून सेक्शन ऑफिसर म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button