भंडारा : पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू | पुढारी

भंडारा : पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : अंगणात असलेल्या पाण्याच्या टाक्यात पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील सरांडी (बु) येथे आज (दि.३) सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. सान्वी छत्रपाल कुथे असे मृत बालिकेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सान्वी लहान बालकांसोबत अंगणात खेळत होती. मुलगी खेळत असल्याने आई घरकामात व्यस्त होती. काही वेळात घरकाम आटोपल्यानंतर बघितले. तर सान्वी अंगणात दिसली नाही. शेजारी जाऊन विचारणा केली. मात्र, सान्वी दिसली नाही. परिसरात शोधाशोध करण्यात आली. दरम्यान अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत सान्वी पडलेली दिसली. तिला तत्कळ पाण्याबाहेर काढून सरांडी (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून तिला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच वाटेत सान्वीचा मृत्यू झाला. या घटनेने सरांडी बू. येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button