सुश्मिताच्या नव्या प्रोजेक्टचं पोस्टर रिलीज; दिसणार या प्रसिद्ध तृतीयपंथीयाच्या भूमिकेत | पुढारी

सुश्मिताच्या नव्या प्रोजेक्टचं पोस्टर रिलीज; दिसणार या प्रसिद्ध तृतीयपंथीयाच्या भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सुश्मिता सेनने काही दिवसांपूर्वीच आगामी प्रोजेक्टबाबत सुतोवाच केलं होतं. नुकताच तिने आगामी प्रोजेक्टचा फोटो शेयर केला आहे. ‘ताली’ असं तिच्या आगामी प्रोजेक्टचं नाव आहे. बायोपिक कॅटेगरीमध्ये असलेली ही वेबसिरीज आहे.
प्रसिद्ध तृतीयपंथी गौरी सावंत हिच्या आयुष्यावर असलेल्या बायोपिकमध्ये सुश्मिता मुख्य भूमिकेत आहे. नुकताच तिने या लुकमधील फोटो शेयर केला आहे. या बायोपिकच्या निमित्ताने सुश्मिता पहिल्यांदाच तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसते आहे. माथ्यावर मोठी टिकली आणि डोळ्यात अंगार असलेली सुश्मिता पोस्टरवर लक्ष वेधून घेते आहे.

‘ताली बजाऊँगी नही , बजवाऊँगी’ हे कॅप्शन देत तिने हा फोटो शेयर केला आहे. गौरी सावंत यांनी तृतीयपंथीयांच्या अधिकारासाठी लढा दिला आहे. याशिवाय तृतीयपंथीयांना मूल दत्तक घेता यावं यासाठी गौरी यांनी न्यायालयीन लढाई लढली. आज अत्यंत अभिमानाने एका मुलीचं पालकत्व स्वीकारून उत्तम सांभाळत आहेत. या सिरीजनंतर सुश्मिता आर्या 3 च्या शूटिंगला सुरुवात करेल. त्यापूर्वी ती गौरीच्या व्यक्तिरेखेत कशाप्रकारे रंग भरते ते समजेलच.

Back to top button