सातारा : कण्हेर धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई | पुढारी

सातारा : कण्हेर धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा; देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यावेळी पाण्याच्या विसर्गाबरोबरच विद्युत रोषणाईही करणायात आली. तिरंग्याच्या रंगांनी ही विद्युत रोषणाई करण्यात आली. हे दृश्य पाहणारा प्रत्येकजण हात उंचावून सॅल्यूट करत होता.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जागोजागी हर घर तिरंगा ही मोहीम सुरु आहे. घरोघरी तिरंगा मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी, असाच संदेश कण्हेर धरण प्रशासकीय यंत्रणेने दिला आहे. धरणाच्या पाण्यावरील हे विद्युत रोषणाईच्या तिरंग्याचे दृष्य पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अनेकांना हे दृश्य आपल्या कॅमेरात टिपण्याचा मोह आवरता आला नाही.

हेही वाचा

Back to top button