बेळगावात ‘एमएलसी’ निवडणूक : मतदानास प्रारंभ | पुढारी

बेळगावात 'एमएलसी' निवडणूक : मतदानास प्रारंभ

बेळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : बेळगाव विधान परिषदेच्या वायव्य कर्नाटक शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज निवडणूका होत आहेत. या निवडणूकीच्या मतदानास सकाळपासून बेळगावात सुरुवात झाली आहे. बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर यांनी मतदान करण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवण्यात आले. मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सने मतदान सुरू असून मार्किंग देखील करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत हे मतदान होणार आहे.

कर्नाटकातल्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात बेळगाव बागलकोट आणि विजापूर हे तीन जिल्हे आहेत. शिक्षक मतदार संघात भाजपकडून अरुण शहापूर काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार बंनुर यांच्यात तिरंगी लढत तर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून हनुमंत निराणी आणि काँग्रेसकडून सुनील संक हे उमेदवार रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यात ९५ बागलकोट जिल्ह्यात ४८ आणि विजापूर जिल्ह्यामध्ये ४७ अश्या १९० मत पेट्या तयार करण्यात आले आहेत. शिक्षक मतदार संघात २५३८८ तर पदवीधर मतदार संघात ९९५९८ मतदार आहेत.

हेही वाचा  

Back to top button