चांदखेड येथे महिला शेतकर्‍यांची शेतीशाळा | पुढारी

चांदखेड येथे महिला शेतकर्‍यांची शेतीशाळा

शिरगाव : तालुका कृषी अधिकारी मावळ व मंडळ कृषी अधिकारी काळे कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने चांदखेड येथे आत्मा योजनेअंतर्गत महिला शेतकर्‍यांची शेतीशाळा उपक्रम राबविण्यात आला. शेतीशाळा उपक्रमात सहा वर्ग घेतले.  भातपिक बिजप्रक्रिया ते काढणी पर्यंत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणप्रवाहात आणणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

चांदखेड येथे झालेल्या वर्गामध्ये महिलांना शेतीशाळा म्हणजे काय? हा उपक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश, भातबियाणे निवड, बिजप्रक्रिया म्हणजे काय ती कशी करावी याबाबत सविस्तर व सखोल मार्गदर्शन आणि याबरोबरच सांघिक खेळ घेऊन कृषी अधिकारी नंदकुमार साबळे, मनीषा घोडके, स्मिता कानडे, कृषीमित्र नितीन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

भात उत्पादन वाढीसाठी बिजप्रक्रिया व गादीवाफे करून त्यावर पेरणी केल्याने होणारे फायदे आणि जमिनीचा पोत राखणे, शेतीविषयक नवीन संकल्पना व त्यांची आजच्या काळातील गरज आदी बाबींवर पहिल्या सत्रात कृषि सहाय्यक मनीषा घोडके व स्मिता कानडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

रत्नागिरी : पहिली भारत गौरव विशेष ट्रेन 21 रोजी धावणार

पुढील वर्ग हे चारसूत्री भात लागवड, खत व्यवस्थापन,कीड व रोग व्यवस्थापन, काढणी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले असल्याची माहिती मंडळ कृषि अधिकारी दत्ता शेटे यांनी सांगितले. चांदखेड येथे आयोजित शेतीशाळेत 25 प्रगतशील महिला शेतकरी उपस्थित होत्या. शेतीशाळेच्या वर्गाचे यशस्वी आयोजन यांनी केले.

Back to top button