बेळगाव : तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी | पुढारी

बेळगाव : तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी

बेळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. ही साहित्‍य परिषद रविवारी (दि. 8 मे) सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन समारंभास काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सीमाभागात मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषिवणार असून विशेष अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे उपस्थित राहणार आहेत. तर मोठ्या संख्येने साहित्यिक व रसिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत. साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील व जिल्हा अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण हे संमेलनाचे संयोजक आहेत.

हेही वाचा  

Back to top button