मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ४०४ जवान घेणार देशसेवेची शपथ | पुढारी

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ४०४ जवान घेणार देशसेवेची शपथ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शनिवारी दि. २३ एप्रिल रोजी ४०४ जवान देश सेवेची शपथ घेऊन सैन्यात रुजू होणार आहेत. या कार्यक्रमाला मराठा लाईट इन्फंट्रीचे नूतन ब्रिगेडियर जयदिप मुखर्जी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दीक्षांत सभारंभात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जवानांची कवायत, प्रशिक्षण दरम्यान विविध कला कौशल्यमध्ये पारितोषक मिळवलेल्या जवानांना प्रमाणपत्र, पदक, चषक देऊन ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

Back to top button