कर्नाटक : हॉटेल चालकांकडून 25 गॅस सिलिंडर जप्त अन्‍न, नागरी पुरवठा खात्याची कारवाई | पुढारी

कर्नाटक : हॉटेल चालकांकडून 25 गॅस सिलिंडर जप्त अन्‍न, नागरी पुरवठा खात्याची कारवाई

निपाणी : पुढारी वृत्तसेवा
निपाणी शहर, कोगनोळी व सौंदलगा येथील हॉटेल्स, रेस्टॉरंटवर छापा टाकून 25 घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडर जप्‍त करण्यात आले आहेत. सदर सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असल्यामुळे ही जप्तीची कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपतहसीलदार अभिजीत बोंगाळे यांनी दिली. तहसील कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या वतीने ही कारवाई झाली.

एकूण 25 घरगुती गॅस सिलिंडर हॉटेल राहत, हॉटेल शाम, हॉटेल पूजा, जसलोक, सिग्नेचर, हॉटेल सौंदलगा, जय भवानी कोगनोळी, अमृततुल्य चहा कोगनोळी, ए-वन बिर्याणी कोगनोळी, दोस्ती हॉटेल कोगनोळी, हॉटेल विजय, व्ही 10 चायनीज कोगनोळी, दीपक टी स्टॉल, श्रीराम, होटेल वर्षा व श्री समर्थ हॉटेल येथून जप्‍त करण्यात आले. याबाबतचा अहवाल प्रांताधिकारी संतोष कामगोंडा यांना पाठवला जाणार असल्याचे बोंगाळे यांनी सांगितले.

एकूण 16 हॉटेल्समध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरल्याचे आढळून आले आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या सहसंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपतहसीलदार अभिजित गायकवाड, एम. ए. मुल्ला, मडिवाळ व कर्मचारी उपस्थित होते. घरगुती सिलिंडिर व्यावसायिक सिलिंडरपेक्षा स्वस्त असल्याने ते हॉटेलमध्ये सर्रास वापरले जात होते.

हेही वाचलत का ? 

Back to top button