बेळगाव : 'लालपरी’ चे बेळगावात दर्शन | पुढारी

बेळगाव : 'लालपरी’ चे बेळगावात दर्शन

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे आंतरराज्य बससेवा बंद होती. त्यामुळे बेळगावात प्रवाशांना ‘लालपरी’ची प्रतीक्षा होती. शुक्रवारपासून आजरा, कणकवली आगारातून बेळगावात बस दाखल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या कर्नाटकची चंदगड-बेळगाव बससेवा सुरु झाली आहे. चंदगड डेपोतून बसससेवा सुरू झाल्यास सुरू झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

कोरोना आणि परिवहनच्या कर्मचार्‍यांच्या संपामुळे मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातून बेळगावात बससेवा ठप्प झाली होती. मागच्या आठवड्यात बेळगाव आगारातून खानापूर-वेंगुर्ला, बेळगाव सावंतवाडी व कुडाळ बस सुरु झाल्या आहेत. आता कोकणातून लालपरीदेखील बेळगावात दाखल झाली आहे. त्यामुळे प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. भविष्यात प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेर्‍या वाढविल्या जाणार आहेत. कोरोनामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. आंतरराज्य बससेवा कोलमडली होती. त्यामुळे प्रवाशांना वडापवर अवलंबून राहावे लागत होते.

निपाणी, संकेश्वर, हुक्केरी भागात याआधीच महाराष्ट्रातून बससेवा दाखल झाली होती. मात्र, बेळगावात बससेवा बंद होती. शुक्रवारी आजरा आगारातील बस बेळगावात दाखल झाली. त्यामुळे आजरा परिसरातील दिलासा मिळाला आहे. दोन्ही राज्यांची बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button