बेळगाव : बिजगर्णीत महिलांसाठी ‘संजीवनी’ योजना | पुढारी

बेळगाव : बिजगर्णीत महिलांसाठी ‘संजीवनी’ योजना

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारची संजीवनी योजना बिजगर्णी ग्रा. पं. मध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रा. पं. कार्यालयात बैठक झाली. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर होते. महिला संघाच्या अध्यक्षपदी सरीता जाधव यांची निवड करण्यात आली.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी गावात महिला प्रतिनिधींची नेमणूक तसेच महिला संघाची स्थापना करण्यात आली. संघात बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, यळेबैल येथील महिलांचा समावेश आहे. संघाच्या उपाध्यक्षदी गीता पाटील(यळेबैल), सेक्रेटरी शालन ओऊळकर (कावळेवाडी), उपसेक्रेटरी अंजली तारिहाळकर (बिजगर्णी) यांची निवड करण्यात आली. महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी एमसीआरपी म्हणून राजश्री जैन, सविता तरळे कार्यरत आहेत. कृषी विभागाकडून आलेल्या योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्षा रेखा सुतार, सदस्य अ‍ॅड. नामदेव मोरे, मेहबूब नावगेकर यांच्यासह माजी ता. पं. उपाध्यक्ष यल्लाप्पा बेळगावकर, मनोहर पाटील, प्रभाकर जाधव, बळीराम भास्कर, रतन सुतार, सावंत तारिहाळकर, शंकर तारिहाळकर, परशराम भास्कर उपस्थित
होते. पुंडलिक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मारुती जाधव यांनी आभार मानले.

हेही वाचलत का ?

Back to top button