बेळगाव : जलजीवनचे उद्दीष्ट मार्च अखेर पूर्ण करा जलसंपदा ; पालकमंत्री गोविंद कारजोळ | पुढारी

बेळगाव : जलजीवनचे उद्दीष्ट मार्च अखेर पूर्ण करा जलसंपदा ; पालकमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे जलजीवन अभियानाचे उदीष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यात यावे, त्याचबरोबर 2019 च्या महापुरामध्ये घरे गमावलेल्याना शंभर टक्के मार्चअखेरपर्यंत निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आदेश जलसंपदा आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिले.सुवर्णसौधमध्ये शुक्रवारी कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली त्रैैमासिक विकास आढावा सभा झाली. खा. मंगल अंगडी, खा. इराण्णा कडाडी, विधानसभेचे उपसभापती आ. आनंद मामणी, आ. दुर्योधन ऐहोळे, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.

कारजोळ म्हणाले, प्रत्येक घराला नळाद्वारे शुध्द पाणी देण्याचा महत्वांकाक्षी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला आहे. जलजीवन मिशनचे यावर्षाचे उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करण्या यावे. अनुदान वाटप करताना काही अडचणी आल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. जिल्ह्याला एकूण 572 कोटी रुपयांचे अनुदान असून 248 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महापूर आणि अतिवृष्टीमुळे 2019 मध्ये घरे गमावलेल्याना निवासस्थान देण्यात यावे, यामध्ये कोणतीही हयगय नको. तहसीलदार आणि पीडीओ यांनी याकडे लक्ष देऊन पात्र कुटुंबांना घर देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांना ऑक्सिजन उत्पादन संयंत्र, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि वैद्यकीय उपकरणांसह अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असेही कारजोळ यांनी सांगितले. प्राथमीक आरोग्य विभागातील रिक्‍त जागी नियुक्‍ती देण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी केल्या. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच.व्ही, आ. अभय पाटील, आ. गणेश हुक्केरी, आ. महादेवाप्पा यादवाड, आ. लखन जारकीहोळी, आ. चन्नराज हट्टीहोळी, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह सर्व विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

आमदारांच्य मागण्या….

आ. गणेश हुक्करी यांनी झोपडपट्टी विकास मंडळामार्फत घरांची बांधकामे तात्काळ हाती घेण्यात यावीत, अशी मागणी केली. तालुका रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयात नियुक्त केले जात आहे. यामुळे तालुक्याच्या रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, असेही ते म्हणाले.

हेही वाचलत का ?

 

Back to top button