बेळगाव : सार्वजनिक मुतारीला कंटाळून कुटुंबांचे स्थलांतर ; युवकाचे लग्नच ठरेना | पुढारी

बेळगाव : सार्वजनिक मुतारीला कंटाळून कुटुंबांचे स्थलांतर ; युवकाचे लग्नच ठरेना

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरात मध्यवर्ती वस्तीत स्वमालकीचे घर आहे. मात्र शेजारी सार्वजनिक स्वच्छतागृह असल्याने 38 वर्षीय युवकाचे लग्न जमत नसल्याची बाब समोर आली आहे. 40 वर्षात या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीला कंटाळून या भागातील तीन कुंटुंबीयांनी अन्यत्र राहणे पसंत केले आहे.

मेणसी गल्लीच्या कोपर्‍यावर 40 वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. मात्र निचरा आणि स्वच्छता होत नसल्याने गटारी तुंबल्या आहेत. भागात दुगर्र्ंधीचे साम्राज्य आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या शेजारी विनायक जाधव यांच्या मालकीचे घर आहे. लग्न ठरवताना मुलीकडचे लोक घरी येतात आणि दुर्गंधीचा अनुभव येताच नकार देतात. असे प्रकार वारंवार घडत आहेत.

स्वच्छतागृह हलवण्यासाठी मनपा, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, बुडा, स्मार्ट सिटी, आमदार, खासदार यांच्याकडे मागणी करून झाली. दुगर्र्ंधीमुळे विनायकची आई सतत आजारी असते, अशी माहिती विनायक जाधव यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.स्वच्छतागृह बांधण्यापूर्वी इथे पोलिस चौकी होती. मुतारी बांधल्यानंतर समोरची भिंत ढासळली असून उघड्यावर विधी उरकण्यात येत आहे.

स्वच्छतागृहामळे माझे लग्न जमेनासे झाले आहे. पाहुणे घरी येतात मात्र येथील दुगर्र्ंधीला कंटाळून मुलगी या ठिकाणी राहणार कशी असा प्रश्‍न उपस्थित करतात.
– विनायक जाधव, मेणसे गल्ली

हेही वाचलत का :

Back to top button