बेळगाव : कणगलेजवळ राष्ट्रीय महामार्गावर युवक, युवती ठार

बेळगाव : कणगलेजवळ राष्ट्रीय महामार्गावर युवक, युवती ठार
Published on
Updated on

संकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : कणगला सर्कलजवळ राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू बोलेरो आणि कारच्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून एक जण जखमी झाला.

पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, तिघे मित्र तवंदी येथील हॉटेलमध्ये जेऊन संकेश्वरकडे परतत असताना निपाणीहून कणगलाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या मालवाहू बोलेरोने स्वीफ्ट कारला डाव्या बाजूने जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातामध्ये कार चालक प्रशांत कलप्पा कोलारगी (वय 24, राहणार कमतनूर तालुका हुक्केरी ) आणि त्याची मैत्रिण श्रध्दा तेलसंगमठ (राहणार अथणी) जागीच ठार झाले.

कारमध्ये सीटबेल्ट लावून बसलेला मित्र नागराज मोहन चौगुला अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी नांगराला उपचार्थ इस्पितळात दाखल केले. सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मालवाहू बोलेरो चालक फरार झाल्याने पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news