बेळगाव : फोन न घेतल्याने आमदार बेनकेंच्या कार्यालयावर दगडफेक, एकावर गुन्हा दाखल | पुढारी

बेळगाव : फोन न घेतल्याने आमदार बेनकेंच्या कार्यालयावर दगडफेक, एकावर गुन्हा दाखल

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : आ. अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्लीतील कार्यालयावर दगडफेक करत दोन तीन खिडक्यांची तावदाने फोडली. रात्रीच्यावेळी फोन केल्यानंतर घेतला नसल्याच्या रागातून चव्हाट गल्लीतीलच तरुणाने हे कृत्य केले. सत्यम जोतिबा नाईक (रा. चव्हाट गल्ली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांचे चव्हाट गल्‍लीत कार्यालय आहे. रविवारी रात्री नशेत सत्यम याने आ. बेनके यांना फोन केला. त्यांनी तो घेतला नसल्याच्या रागातून चव्हाट गल्लीतील कार्यालय गाठले. दोन खिडक्यांच्या तावदानावर दगड मारत काचा फोडल्या.

सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आ. बेनके हे सध्या अधिवेशनामुळे बंगळुरात आहेत. त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनी हा प्रकार पाहून मार्केट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये सत्यमचा चेहरा स्पष्टण दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी सत्यमविरोधात सुओ-मोटो फिर्याद दाखल करून घेतली. संशयिताचा शोध सुरू आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button