IND vs PAK : भारत-पाक सामन्यापूर्वी विराट कोहलीने बाबरला दिली ‘टिप’, दोघांची दुबईत झाली भेट

IND vs PAK
IND vs PAK
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप 2022 स्पर्धा येत्या शनिवारी (27 ऑगस्ट) पासून युएई येथे सुरू होईल. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघ यूएई (UAE) येथे पोहोचले आहेत. टीम इंडिया आपला पहिला सामना 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा स्थितीत सर्व संघ जोरदार सराव करत आहेत. सरावादरम्यान भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची भेट घेतल्याचे सामोर आले आहे.     (IND vs PAK)

आशिया कपसाठी टीम इंडिया यूएईला पोहोचली आहे. दरम्यान, सरावादरम्यान टीम इंडियाचे अनेक खेळाडू पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भेटले. हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांनी राशिद खान आणि मोहम्मद नबी यांची भेट घेतली. यादरम्यान विराट कोहलीने बाबर आझमची भेट घेऊन हस्तांदोलन केले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो वेगाने व्हायरल होत आहे. (IND vs PAK)

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवरील गेम प्लॅन शोमध्ये विराट कोहलीने टीकाकारांना उत्तर दिले. तो म्हणाला, 'इंग्लंडमध्ये जे घडले ते वेगळेच होते, मी माझ्या शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा केली आहे. आता मला फलंदाजीत कोणतीही अडचण दिसत नाही.' तो पुढे म्हणाला, 'मी काय करत आहे हे मला माहीत आहे.

जेव्हा तुमच्याकडे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करण्याची क्षमता नसेल तेव्हा तुम्ही तुमच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इतके पुढे जाऊ शकत नाही."जोपर्यंत मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत मला माहित आहे की चढ-उतार असतील आणि जेव्हा मी या टप्प्यातून बाहेर पडेन तेव्हा मला माहित आहे की मी किती सातत्य राखू शकतो. माझे अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत', असेही त्याने सांगितले.

विराट कोहलीवर नजर असेल

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. अडीच वर्षांत त्याच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही. 2019 मध्ये त्याने शेवटचे शतक झळकावले होते. विराटचे पाकिस्तानविरुद्ध चांगले रेकॉर्ड आहे. त्यामुळे पाकविरुद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा त्याच्यावरच असतील हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news