कोल्हापूर : भामटे येथे सर्पदंशाने शाळकरी मुलीचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : भामटे येथे सर्पदंशाने शाळकरी मुलीचा मृत्यू

कोपार्डे; पुढारी वृत्तसेवा :  भामटे (ता. करवीर) येथे झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने नुपूर ऊर्फ ज्ञानेश्‍वरी सचिन यादव (वय 10) या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला.

ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सचिन यादव यांच्या घरातील सर्व झोपले होते. त्यावेळी सापाने सुरुवातीला नुपूरला दंश केला. तिने आई नीलमला उठविले. त्यावेळी तिलाही सापाने दंश केला. त्या दोघींना तातडीने कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना नुपूरचा मृत्यू झाला. आईवर उपचार सुरू आहेत. या विषारी सापाला पानारवाडी येथील सर्पमित्रांनी पकडले आहे. नुपूर ही विद्यामंदिर भामटे येथे पाचवीच्या वर्गात शिकत होती.

Back to top button