पुणे : दहा लाख खंडणी मागणारे दोन सावकार गजाआड; खंडणीविरोधी पथकाची कारवाई | पुढारी

पुणे : दहा लाख खंडणी मागणारे दोन सावकार गजाआड; खंडणीविरोधी पथकाची कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आर्थिक अडचणीच्या वेळी व्याजाने घेतलेले पैसे वेळोवेळी व्याज व मुद्दल स्वरूपात परत दिले असतानाही आणखी 10 लाख रुपयांची मागणी करून आर्थिक व शारीरिक शोषण करणार्‍या दोघा सावकारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 23) बेड्या ठोकल्या. राहुल बाळकृष्ण कोंढरे (वय 42, रा. बबन स्मृती, दत्तनगर रोड, आंबेगाव बुद्रुक) आणि विजय गणपत कुंभारकर (वय 38, रा. धायरी फाटा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा सावकारांची नावे आहेत.

न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी एका 33 वर्षाच्या व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 1 जून 2019 ते 23 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला. फिर्यादी व्यवसायाने शेतकरी असून, त्यांचा दुग्ध व्यवसायदेखील आहे. आर्थिक अडचणीच्या वेळी त्यांनी सावकारांकडून प्रतिमहिना आठ ते दहा टक्के व्याजाने पैसे घेतले होते. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विजय गुरव, प्रदीप शितोळे यांच्या पथकाने केली.

Back to top button