बीड : टेम्‍पो लूट प्रकरणातील फिर्यादीच निघाला आरोपी; एलसीबीकडून अटक

हॉटेलांध्ये मेलेल्या कोंबड्यांची विक्री
हॉटेलांध्ये मेलेल्या कोंबड्यांची विक्री
Published on
Updated on

माजलगाव (बीड); पुढारी वृत्‍तसेवा : शहरा जवळील केसापुरी येथे दि. १५ रोजी रात्री १२ वाजता अज्ञातांनी टेम्पो अडवून अडीच लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा एलसीबीने तपास करून अवघ्या २४ तासात संशयित आरोपी जेरबंद केले असून, फिर्यादीच आरोपी निघाल्याने काही वेळासाठी पोलीस ही चक्रावून गेले.

या विषयी अधिक माहिती अशी की, चालक शेख अख्तर शेख पाशा ( वय ३२ वर्ष, रा. किल्ला वेस, बीड) हा त्याच्या ताब्यातील आयशर क्रमांक एम.एच. ४३ वाय २५८४ घेऊन बीड येथून मुर्तिजापूर (जि. वाशीम) कडे सरकीचे गंधक आणण्यासाठी माजलगाव मार्गे निघाला होता. केसापुरी जवळ विनानंबरच्या दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी टेम्पो अडवून गाडी कशी चालवतोस असे विचारुन पाठीमागे बघ म्हटले.

यावेळी टेम्‍पो चालकाने गाडी थांबवली. मागे येऊन पहाताना त्‍यांना दोन इसमांनी मारहाण केली आणि त्‍यांच्याकडचे २ लाख ४५ हजार रुपये घेऊन बळजबरीने ते पसार झाले. या विषयीची फिर्याद टेम्पो चालक शेख अख्तर याने दिली. त्यावरून ग्रामीण पोलीस ठाणे माजलगावमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी गुन्ह्याचा छडा लावण्याचे एलसीबी पथकाला आदेश दिले. घटनेचा तपास करताना गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा टेम्पो चालकानेच त्याच्या सहकार्यांच्या मदतीने घडवून आणला. या संशयावरून एलसीबी पथकाने तेलगाव नाका, बीड येथून शेख अख्तर शेख पाशा, शेख रफीक शेख लतीफ या दोघांना जेरबंद केले. या दोघांनाही दोन साथीदारांच्या सहकार्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयितांना माजलगाव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news