बीड: ‘माझ्या बापाला वाचवा’ म्हणत मुलीने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

मुलीने लिहीले मुख्यमंत्र्यांना पत्र
मुलीने लिहीले मुख्यमंत्र्यांना पत्र
Published on
Updated on

माजलगाव(बीड), पुढारी वृतसेवा : पुणे येथील मुलाचे लग्न जमत नसल्याने त्याच्याकडून स्थळ पाहण्यासाठी दलाली घेण्यात आली आहे. त्यानंतर मुलीच्या वडीलांना लग्नासाठी तयार केले. उसणे पैसे देतो म्हणून जमीन लिहुन घेतली आणि विवाहानंतर दहा दिवसांत पुणे येथून पतीने माहेरी पाठवून दिले. हा सारा खेळ करणारा सावकार पैसे परत घेऊनही जमीन परत देण्यास नकार देत आहे. यामुळे बाप व्यथीत असून तो कधीही आत्महत्या करून शकतो. त्याला वाचवा अशी व्यथा मांडत पीडित मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले.

पुजा शेखर सावंत (वय 24 वर्षे, रा.कुप्पा, ता.वडवणी. हल्ली मुक्काम पुनंदगाव ता.माजलगाव जि.बीड) या विवाहित तरुणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे आणि त्‍यामध्ये तिने आपली व्यथा मांडली आहे.

ती पत्रात म्हणते, माझे शिक्षण सुरु असल्याने आणि नौकरी न लागल्याने आई- वडिलांनी माझा विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाह करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून घरचे नकार देत होते. दरम्यान गावातील (कुप्पा ता.वडवणी)  खाजगी सावकार मारोती लिंबाजी वाघमारे याने पुणे येथील एक स्थळ आणले. मुलगा खुप चांगला आहे, असे सांगत लग्नाला होकार दया म्हणून आग्रह केला. तुमच्याकडे पैसे नसतील तर मी उसने देतो, तुम्ही लग्नास होकार दया असे सांगितले. यानंतर परिवारातील सर्व जण लग्नासाठी तयार झालो. त्यानंतर सावकार मारोती वाघमारे याने 8 लाख 50 हजार रूपये दिले.

लग्न जवळ आले अन् सावकराने पैसे 4 रुपये टक्क्याने राहुद्या, मला दोन एक्कर जमीन नावची करुन द्या, असे सांगितले. लग्न जवळ आल्याने कोणताही पर्याय नव्हता. यामुळे 32 लाख रूपये किमतीची दोन एक्कर जमिनीचे खरेदी खत सावकाराच्या नावे तात्पुरते करुन दिले. 4 एप्रिल रोजी माझे लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर नवर्‍याने अवघ्या 10 दिवसात माहेरी पाठवून दिले. दरम्यान वडिलांनी सावकाराचे व्याजासह पैसे परत करुनही जमीन परत दिली नाही.

माझे लग्न लावून दिले, तरी मी घरीच आहे त्यामुळे वडिल शेखर रामचंद्र सावंत हे खचून गेले आहेत. त्यांनी यापूर्वी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. आम्हीच त्यांना कसा तरी धीर देत आहोत. मात्र आता माझाही संयम तुटत असून मोठं होवून जगण्यापेक्षा अगोरदरच मेले असते तर आई- वडिलांपुढे एवढे मोठे संकट उभे राहिले नसते. अशा अशायचे पत्र पुजा सावंत या विवाहितेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. वडिल जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमीन आम्हाला पतर मिळून द्या, अशी मागणी तिने पत्रात केली आहे.

आमच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे; पुजा सावंत

सावकार मारोती वाघमारे याने मुलगा गणेश मारोती वाघमारे याच्या नावावर दोन एक्कर जमिनीचे खरेदी खत तात्पुरते करुन घेतले होते. पैसे परत देऊनही तो जमीन परत करण्यास नकार देत आहे. यामुळे आमच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत सविस्तर माहिती दिली. संबंधित सावकाराने मुलाकडून देखील दलाली घेतली असून मला लग्नाच्या आठ दिवसानंतर नवर्‍याने घरातून हाकलून दिले. सावकाराने आम्हाला फसवले आहे.
– पुजा शेखर सावंत 

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news