

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. सय्यद सुहेल, उमर, जानिद, मुदासीर आणि जाहिद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या पथकाने बंगळुरमध्ये स्फोट घडवून आणण्याची योजना आखल्याचा संशय आहे. हे पाचही जण २०१७ च्या खून खटल्यात आरोपी होते. ते परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात होते जिथे ते दहशतवाद्यांच्या संपर्कात आले होते. सीसीबीने स्फोटक साहित्यही जप्त केले आहे.
"हे मोठे षडयंत्र आहे. त्यांना बंगळुरमध्ये बॉम्बस्फोट घडवायचे होते. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात यावे," असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटल आहे.
सीसीबीने अटक केलेल्या पाच संशयित दहशतवाद्यांबद्दल पोलिस आयुक्त दयानंद यांनी सांगितले की, "बंगळूर शहरात तोडफोड करण्याची योजना आखणाऱ्या लोकांचा माग काढण्यात सीसीबीला यश आले आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडुन सात पिस्तूल, अनेक जिवंत गोळ्या, एक वॉकीटॉकी आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. फरार असलेल्या आरोपींपैकी एकाने ही हत्यारे काही विध्वंसक कारवाया करण्यासाठी अटक केलेल्यांना पुरवल्या होत्या.
हेही वाचा