

पुढारी ऑनलाईन डेस्क : बालिका वधू फेम नेहा मर्दाच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे. एक आठवड्यापूर्वी कोलकातामध्ये प्रेग्नेंसीविषयी वृत्त समोर आले होते. रिपोर्टनुसार, नेहा मर्दा सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. (Neha Marda) डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. नेहा मर्दाने लग्नाच्या १० वर्षांनंतर मुलीला जन्म दिला आहे. आपल्या आणि बाळाच्या आरोग्याविषयी नेहाने उघडपणे सांगितले आहे. (Neha Marda)
नेहा मर्दाने बाळाच्या जन्मानंतर सांगितले की, तिला रक्तदाबाची समस्या होती. ती म्हणाली, प्रेग्नेंसीनंतर मला बीपीची समस्या होत होती. पाचव्या महिन्यात आणखी चिंता वाढली आणि रक्तदाब वाढला. आमच्या डॉक्टरांनी आधीपासून सर्व तयारी केली होती. मी खुश आहे की, माझ्या जीवनातील हा टप्पा संपला. मी एका सुंदर मुलीला जन्म दिलाय. आणि आम्ही दोघीही ठिक आहोत.' नेहाने आपल्या इन्स्टावर मुलीची पहिली झलकदेखील शेअर केलीय.