

पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अलीगढहून राम मंदिराला सुमारे ४०० किलो वजनाचे कुलूप आणि चावी अयोध्येत आणण्यात आली आहे. हे कुलूप आणि चावी बनवण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागला आहे. सुमारे १० फूट उंच, ४.६ फूट रुंद आणि ९.५ इंच जाडीचे हे कुलूप जवळजवळ २ लाख रुपये खर्चून बनवले आहे.
(Ayodhya Ram Mandir)
दोन वर्षांपूर्वीच अलिगढमधील ६७ वर्षीय कारागीर सत्य प्रकाश यांनी अयोध्येतील मंदिरासाठी ४०० किलो वजनाचे महाकाय कुलूप बनवण्यास सुरुवात केली होती. त्याच्या निर्मितीचे काम अंतिम टप्पात असतानाच प्रकाश यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. कुलूप आणि प्रत्येकी १५ किलो वजनाच्या दोन चाव्या अयोध्येला पाठवल्यानंतर त्यांची अखेरची इच्छा पूर्ण झाली आहे. (Ayodhya Ram Mandir)
हेही वाचा :