

धनबाग; वृत्तसंस्था : झारखंडमधील धनबाद येथील 85 वर्षांच्या सरस्वती देवी या राम मंदिरासाठी गेल्या 30 वर्षांपासून मौनव्रत पाळत आहेत. प्राणप्रतिष्ठापनादिनी त्या आपले कठीण व्रत सोडणार आहेत. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
संबंधित बातम्या :
बाबरीचे पतन झाल्यानंतर सरस्वती देवी यांनी अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत नाही, तोपर्यंत मौनव्रत धारण करणार असल्याचा द़ृढ संकल्प केला होता. 22 जानेवारी रोजी हा सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर त्या भावनिक झाल्या आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी या व्रताचे पालन केले आहे. घरातील लोकांशीही त्या सांकेतिक भाषेतच संवाद साधतात. या व्रतामुळे त्यांना मौनीमाता म्हणूनही ओळखले जाते. या सोहळ्यासाठी त्या रेल्वेतून अयोध्येला रवाना झाल्या आहेत. महंत नृत्य गोपालदास यांच्या शिष्याकडून त्यांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
हेही वाचा :