Olectra Electric Tipper : इलेक्ट्रिक टिप्पर लवकरच भारतीय बाजारपेठेत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या समूह कंपनी, ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमीटेडची घौडदौड फक्त शेअर बाजारातच नाही तर ई वाहन उत्पादन क्षेत्रात देखील चालु आहे. (Olectra Electric Tipper)
ऑलेक्ट्राच्या घोषणेनुसार, भारताच्या पहिल्या 6×4 हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक टिप्परला भारतीय ऑटोमोबाईल नियामक संस्थेकडून रस्त्यावर चालण्यासाठी योग्य असल्याचे देशातील पहिले प्रमाणपत्र मिळाले आहे. केंद्रीय मोटार वाहन सर्व नियमांचे पालन करून इलेक्ट्रिक टिप्पर आता रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाला आहे.
ई-टिप्परने भारतीय रस्त्यांसाठी गरजेच्या असणाऱ्या, खडतर परिस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या सर्व चाचण्या पार केल्या आहेत. ज्यामध्ये उंचीवरील पर्वतीय भूभाग, खाणकाम आणि खोदकामासाठी लागणारी जमीनीखालील कार्यक्षमता इत्यादी समाविष्ट आहे. विना आवाज, विना धूर अश्या वैशिष्ट्यांमुळे हा टिप्पर रात्रंदिवस कामाच्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो. (Olectra Electric tipper)
इलेक्ट्रिक टिप्परमूळे बांधकाम, पायाभूत सुविधा, खाणकाम आणि उत्खनन क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी आवश्यक असलेल्या वजनदार आणि मोठ्या वस्तुमानाच्या सामानामुळे या क्षेत्रांकडून ई टिप्परला खूप मागणी असेल.
ऑलेक्ट्रा इलेक्ट्रिक टिप्पर एकूण खर्चाच्या (TCO) दृष्टीने किफायतशीर आहे असा कंपनीचा दावा आहे, यामूळे व्यवसायिकांच्या नफ्यात वाढ अपेक्षित आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री केव्ही प्रदीप यांनी ऑलेक्ट्रा भारतातील इलेक्ट्रिक हेवी व्हेईकल सेगमेंटमध्ये मुख्य भूमिका बजावत असल्या बद्दल आनंद व्यक्त केला.
भारतातील पहिल्या प्रमाणित हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक टिप्परचा विकास आणि उत्पादन ऑलेक्ट्राने केले आहे.
दिल्ली आणि बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रदर्शनात प्रोटोटाइप टिप्पर मांडण्यात आला होता. व्यवसायीकाकडून प्रचंड उत्सुकतेने याची माहिती घेतली गेली. आता 20 ई-टिप्पर्सची पहिली ऑर्डर चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहे. ऑलेक्ट्रा लवकरच ई-टिप्पर आणि इलेक्ट्रिक ट्रकचे विविध प्रकार बाजारात आणणार आहे.
हेही वाचा
- Twitter Down : ट्विटर लॉगिन करण्यात समस्या; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
- Billi Billi Song :सलमान पूजा हेगडेसोबत ‘बिल्ली बिल्ली’वर थिरकला
- Stock Market Opening | सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढला, निफ्टी १७,४०० वर