Stock Market Opening | सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढला, निफ्टी १७,४०० वर | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढला, निफ्टी १७,४०० वर

Stock Market Opening : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज बुधवारी (दि.१) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीला सेन्सेक्स ३७० अंकांच्या वाढीसह ५९, ३३२ वर गेला. तर निफ्टी १७, ४०० वर होता. अदानी समूहाच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून येत आहे. येस बँक (४.५८ टक्के वाढ), व्होडाफोन (०.०७४ टक्के), टाटा स्टील (१.२९ टक्के), वेदांता (१.५८ टक्के), अदांनी एंटरप्रायजेस (६.९० टक्के), आयडीएफसी फर्स्ट बँक (०.१८ टक्के), अदानी टोटल गॅस (३.४६ टक्के), अदानी पोर्ट्स (२.७० टक्के) हे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात वाढले होते.

मारुती, टेक महिंद्रा, विप्रो, एशियन पेंट्स, कोटक बँक, रिलायन्स, एचडीएफसी, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, अल्ट्रा टेक, टायटन, इन्फोसिस, आयसीआयसीआय, आयटीसी हे शेअर्सही वधारले आहेत.

जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार असलेल्या चीनमधील उत्पादन प्रक्रिया वाढल्याच्या रिपोर्टमुळे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेलाच्या किमती वाढल्या. यामुळे जागतिक इंधनाच्या मागणीला चालना मिळाली. ब्रेंट क्रूड तेलाचा दर ०.३ टक्के वाढून ८३.६९ प्रति बॅरलवर गेला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button