राजेंद्र उट्टलवार

राजेंद्र उट्टलवार दैनिक पुढारीचे नागपूर विशेष प्रतिनिधी आहेत. ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक म्हणून ते गेली 34 वर्षे विदर्भातील वृत्तपत्र सृष्टीत कार्यरत आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात सातत्याने विधानसभा वृत्तांकन, ज्येष्ठ पत्रकार म्हणून दिल्ली संसदीय अभ्यास वर्गाला उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली आहे. लोकसभेच्या तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांचे हस्ते सन्मान झालेला आहे. विदर्भातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण, विशेष पानांचे संयोजन, साप्ताहिक सदर नियमित स्तंभलेखन, राज्यस्तरीय उत्कृष्ट वृत्तलेखनासह त्यांना विविध पुरस्कार मिळालेल आहेत. दूरदर्शन, आकाशवाणी आणि विविध वाहिन्यांवर विधिमंडळ कामकाज संदर्भात समालोचन, राजकीय विश्लेषण, मनोरंजन, साहित्य विषयक साप्ताहिक पुरवण्याचे संयोजन, संपादन अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत.
Connect:
राजेंद्र उट्टलवार
logo
Pudhari News
pudhari.news