

नागपूर : नवीन काटोल नाका समोरील टोल नाका परिसरात घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर कळमेश्वर रोडवर रविवारी (दि.४) पावणेतीनच्या सुमारास हा दुहेरी भीषण अपघात घडला. कळमेश्वर येथून नागपूरकडे स्कुटीवरून (MH 12 MP 6847) जात असताना नागपूरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या इको छोटा हत्तीची (MH 31 FC 4333) धडक झाली. त्यानंतर इको छोटा हत्ती नवीन काटोल नाकाकडे जाणाऱ्या ट्रकला (MH 43 CM 2786 समोरून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोचा चेंदामेंदा झाला. यात चालक रोशन कडूजी टेकाम, रमेश देहनकर 3 आणि मसराम हे तीन जण मृत्युमुखी पडले. स्कुटी चालक माणिक महादेवराव बंधराम हे जखमी झाल्याने मेयो हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. ट्रक चालक शेख रफिक यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून स्कूटी चालकाने दिलेल्या माहितीनुसार छोटा हत्तीचा चालक ओव्हरटेक करीत होता. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.