आशिष देशमुख

आशिष देशमुख हे दैनिक पुढारी समूहात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. विज्ञान विषयक पत्रकारिता गेल्या 25 वर्षापासून ते करीत असून यात पर्यावरण पत्रकारिता त्यांनी विशेषत्वाने विकसित केली आहे.बदलते हवामान या विषयावर ते सातत्याने लिखाण करीत असून त्यांना पिंपरी चिंचवड एडिटर गिल्डचा 2022 चा मनाचा शोध पत्रकरिता हा पुरस्कार मिळाला आहे. पुण्यातील आयआयटीएम, आयुका,आयसर,आयएमडी यासह अनेक विज्ञान संस्थातील विविध विज्ञान विषयक बातम्या त्यांनी सर्वप्रथम दैनिक पुढारी च्या माध्यमातून वाचकांपुढे आणल्याआहेत. संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील बातम्यांचे सलग दहा वर्षे त्यांनी वार्तांकन केली असून त्याबद्दल त्यांना तत्कालीन न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी विशेष प्रमाणपत्र गौरव केला आहे. विधिमंडळाचे हिवाळी, अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशनाचे त्यांनी सलग बारा वर्षे वार्तांकन केले आहे.
Connect:
आशिष देशमुख
logo
Pudhari News
pudhari.news