Arnab Cyclon | ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे दहा राज्‍यांत पावसाचा इशारा

आंध्रच्या दिशेने सरकले, महाराष्ट्रासह ओडिशामार्गे, उत्तर प्रदेशात जाणार
Arnab Cyclon |
Arnab Cyclon | ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे दहा राज्‍यांत पावसाचा इशारा
Published on: 
Updated on: 

पुणे : बंगालच्या उपसागरात सोमवारी सकाळीच ‘अर्णब’ चक्रीवादळ तयार झाले. आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून २७ रोजी विशाखापट्टणमकडे जमिनीवर येणार आहे. पुढे ते २८-२९ रोजी तामिळनाडू, हैदराबाद, विदर्भाजवळून मध्य प्रदेशात जाणार आहे. हे वादळ थेट उत्तर भारतात जाऊन वाराणसीत ३० रोजी शांत होणार आहे.

या वादळाचा प्रवास समुद्रातून विशाखापट्टणमच्या दिशेने सुरू झाला असून, मंगळवारी ते विशाखापट्टणम, विजयवाडा या ठिकाणी जमिनीवर येईल. तेथून ते वारंगळ, हैदराबाद आणि विदर्भातील नागपूरमार्गे मध्य प्रदेशचे जबलपूर, भिलाई आणि ३० रोजी वाराणसीत दाखल होऊन शांत होईल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. हे वादळ २८ च्या सकाळपर्यंत आंध्र प्रदेश, यानम किनारपट्टीवर, बापटला आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान (यानमच्या जवळ) अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊन धडकण्याची दाट शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा कमाल वेग ताशी ११५-१२५ कि.मी. असेल. तो काही ठिकाणी ताशी १४० कि.मी.पर्यंत पोहोचू शकतो.

विदर्भात पावसाचा जोर

हे चक्रीवादळ विदर्भातून जाणार आहे. त्यामुळे त्या भागातच पावसाचा जास्त जोर २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान राहील. उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

असे आहेत पावसाचे अलर्ट (२७ ते ३० ऑक्टोबर)

ऑरेंज अलर्ट : गडचिरोली (२८). यलो अलर्ट : रत्नागिरी (२९), नाशिक (२८, २९), अहिल्यानगर (३०), पुणे घाटमाथा (२९), कोल्हापूर शहर, घाटमाथा (२८), सातारा (२९), जालना (२९), हिंगोली (२८), नांदेड (२८), अमरावती (२९), भंडारा (२८, २९), चंद्रपूर (२७ ते २९), गडचिरोली (२९, ३०), गोंदिया (२८, २९), नागपूर (२८, २९), वाशिम (२७, २८), यवतमाळ (२७ , २८).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news