cruise drugs case: आर्यन खानची आज होणार सुटका

आर्यन खान
आर्यन खान
Published on
Updated on

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी आर्यन खान याला ( cruise drugs case ) गुरुवारी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने जामीन मंजूर केला होता. आज (दि. ३०)  त्‍याच्‍यासह या प्रकरणातील अन्‍य दोन आरोपींची जामीनावर सुटका होणार आहे. जामीन मंजूर झाल्‍यानंतर शुक्रवारी सत्र न्‍यायालयातील जामीनपत्र भरण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्‍यामुळे जामिनाची कागदपत्रे मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील पेटीत जमा होवू शकली नाहीत. त्‍यामुळे आर्यनची सुटका लांबणीवर पडली हाेती. जामीन पेटीत कागदपत्रे जमा झाली आहेत. सकाळी दहापर्यंत त्‍याची सुटका होईल, अशी अशी माहिती कारागृहाच्‍या सूत्रांनी दिली.

ड्रग्‍ज प्रकरणी अटक झालेल्‍या आर्यन खानची जामीनावर सुटका करताना न्‍यायलयाने एकुण १४ अटी ठेवल्‍या आहेत. न्‍यायालयाच्‍या परवानगीशिवाय त्‍याला देशाबाहेर जात येणार नाही. तसेच आर्यन खानकडून अटींचा भंग झाल्‍यास त्‍याची जामीन रद्‍द करावी, अशी मागणी एनसीबी करु शकते, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे. आर्यन खान याला दर शुक्रवारी एनसीबीच्‍या कार्यालयात उपस्‍थित राहावे लागणार आहे.

( cruise drugs case ) 'एनसीबी'ने केला होता जामिनास विरोध

गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी पुन्‍हा मुंबई उच्‍च न्‍यायालयात न्‍यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्‍यासमोर आर्यन खानच्‍या याचिकेवर सुनावणी झाली होती. यावेळी एनसीबीच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना अतिरिक्‍त सॉलिसिएर जनरल ( एएजी) अनिल सिंग म्‍हणाले होते की, आर्यन खान मागील दोन वर्षापासून तो नियमित ड्रग्‍जचे व्‍यसन करत आहे. मागील दोन वर्षांमध्‍ये त्‍याने मोठ्य्या प्रमाणावर ड्रग्‍ज विकत घेतले आहे. तो ड्रग्‍ज सेवनाबरोबरच त्‍याची विक्रीही करत होता. ड्रग्‍ज रॅकेटचा तो भाग आहे, असे सांगत त्‍याला जामीन देण्‍यात येवू नये, अशी मागणी त्‍यांनी केली होती.

'एनसीबीने केला अधिकारांचा गैरवापर'

मंगळवारी ( दि. २६ ) झालेल्‍या सुनावणीवेळी माजी ॲटर्नी जनरल आणि विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी आर्यनसाठी युक्‍तीवाद केला. आर्यन खान याला या पार्टी आमंत्रण होते. त्‍याने क्रूझने गोव्‍याला जाण्‍यासाठी तिकिटही काढले नव्‍हते. आर्यनकडे कोणत्‍याही प्रकारचे ड्रग्‍ज सापडलेले नाही; मग त्‍याला अटक कशी केली? असा सवाल करत एनसीबीच्‍या अधिकार्‍यांनी अधिकाराचा गैरवापर करत आर्यन खान याला अटक केली, असेही त्‍यांनी सांगितले. अरबाझ मर्चंट याच्‍याकडे काही प्रमाणात ड्रग्‍ज सापडले. आर्यन खानचा ड्रग्‍जशी कोणत्‍याही प्रकारचा संबंध नाही. त्‍याची वैद्‍यकीय चाचणी देखील घेतली गेली नाही. आर्यन खानला टार्गेट केले जातंय, असेही रोहतगी म्‍हणाले होते.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news