Malaika-Arjun break up : मलायका-अर्जुनचा निर्णय पाहून सर्वांना धक्का

malaika arora and arjun kapoor
malaika arora and arjun kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांच्या ब्रेकअप (Malaika-Arjun break up) झाल्याचे वृत्त येऊन धडकले आणि त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली. चार वर्षांच्या रिलेशनशीपनंतर या कपलचा ब्रेकअप झाल्‍याच्‍या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला; पण, यावर अधिकृतपणे कोणाचीही प्रतिक्रिया समोर आली नव्‍हती; पण, आता अर्जुनने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आणि सर्वांना पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. (Malaika-Arjun break up)

अर्जुन कपूरने मलायका आरोरासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केलाय. हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. असल्या अंधूक म्हणजे अधार नसलेल्या अफवांना आयुष्यात कोणतेच स्थान नाही. चांगले राहा, सुरक्षित राहा…लव्ह यू ऑल..असं त्याने त्याच्या फोटो पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमधून त्याने त्याच्या ब्रेकअपच्या अफवा फेटाळून लावली आहे.

खास बाब म्हणजे, या पोस्टवर मलायकाने देखील कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केलीय. त्यांचं प्रेम अबाधित असल्याचं तिनं स्पष्ट केलंय.

अर्जुनने मलायकाशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत. असे वृत्त काल समोर आले होते. मलायका अरोरा गेल्या ६ दिवसांपासून घराबाहेर पडलेली नाही. ब्रेकअपच्या शॉकने तिला एकटे राहायचे आहे आणि घराबाहेर पडण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगितले जात आहे. अर्जुन कपूर पूर्वी रिया कपूरच्या घरी डिनरसाठी गेला होता. रियाचे घर मलायकाच्या घराच्या अगदी जवळ असूनही अर्जुन कपूर तिथे गेला नाही. मलायका आधी अर्जुन कपूरसोबत फॅमिली डिनरला जायची, पण आता अर्जुन फॅमिलीसोबत एकटा वेळ घालवत आहे, अशी माहिती समोर आली होती.

जेव्हा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली तेव्हा काही लोकांना त्यांचे नाते विचित्र वाटले पण हळूहळू सर्वांनी त्यांचे नाते स्वीकारले.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news