Cow Hug Day अखेर रद्द; ट्रोलिंगनंतर सरकारने घेतला आदेश मागे
पुढारी ऑनलाईन : व्हॅलेंटाईन डे दिवशी गाईंला मिठी मारण्याचे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने केले होते. पण हे यावर मोठ्या प्रमाणावर टीका आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग झाल्यानंतर हे आदेश आता मागे घेण्यात आले आहेत. १४ फेब्रुवारी हा दिवस जगभर व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो, हा दिवस Cow Hug Day साजरा करण्याचे आवाहन करणारे आदेश या मंत्रालयाने काढले होते.
मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारे अॅनिमल वेलफेअर बोर्डने हे आदेश काढले होते. भारतीय जनता पक्षाचे पुरुषोत्तम रुपाला या खात्याचे मंत्री आहेत.
बोर्डाचे सचिव एस. के. दत्ता यांनी हे आदेश मागे घेण्यात आल्याचे सांगितले. या संदर्भातील बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.
"पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार १४ फेब्रुवारीला Cow Hug Day साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे आवाहन मागे घेण्यात येत आहेत," असे दत्ता यांनी म्हटले आहे.
हेही वाचा

