पिंपरी : ‘व्हॅलेंटाइन डे’ गिफ्टने सजली बाजारपेठ

Gift market for Valentine's Day
Gift market for Valentine's Day
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या व्हॅलेंटाइन डे च्या सेलिब्रेशनसाठी तरुणाई सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये गिफ्ट हाऊस, मॉल्स, मार्केटसच्या बाहेर भेटवस्तू खरेदी करण्यासाठी तरुणाईची गर्दी होत आहे.
प्रेमाचे प्रतीक असणारे शो पीस  व्हेलेंटाईन डे साठी टेडी बिअर देणे ही परंपरा अजून चालत असली तरी दरवर्षी काहीतरी हटके देण्याकडे तरुणाईचा कल असतो. त्यामुळे प्रेम व्यक्त करणारे व दर्शविणारे शो पीस, कुशन, फ्रेम , ब्रेसलेट, लॉकेट अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे.

रेड- व्हाईट – ब्लॅक थीम

सध्या व्हेलेंटाइन डे साठी एक हटके लूक आणि थीम फॉलो करण्याचा ट्रेंड दिसतो. यासाठी रेड-व्हाईट, रेड-ब्लॅक अशा कलर थीमनुसार ड्रेसिंग केले जाते. महिलांसाठी खास लाल रंगात असणारे लाँग वनपीस, गाऊन्स, पार्टी वेअर, आकर्षक पद्धतीच्या अ‍ॅक्सेसरीस, आकर्षक भेटवस्तू अशा वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तसेच विविध प्रकारचे चॉकलेट आणि केक यांच्यादेखील खरेदीच्या ऑफर सुरू आहेत. हव्या तशा थिममध्ये केक तयार करण्यासाठी ऑर्डर बुक केल्या जात आहेत.

विविध प्रकारच्या पर्स आणि बॅग
हातात कॅरी करण्यासाठी हव्या त्या कलर कॉम्बिनेशनच्या पर्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याकरिता किरकोळ विक्रेत्यांपासून केवळ बॅग्ज, पर्सच्या दुकानांमध्ये व्हाईट, रेड, गोल्डन अशा रंगांच्या पर्सची अनेक व्हरायटी पाहायला मिळते. व्हॅलेंटाईनसाठी हादेखील एक गिफ्ट देण्याचा एक उत्तम पर्याय आहे.

मुलांसाठी टी शर्ट व जॅकेट
मुलींसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. तर मुलांसाठी टी शर्ट व जॅकेट देण्याचा एक चांगला पर्याय तरुणींकडे असतो. तसेच ब—ेसलेट, लॉकेट असेही पर्याय उपलब्ध आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news