

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेसबुक मित्राशी लग्न करण्यासाठी भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू पुन्हा भारतात परतणार आहे. चार महिन्यांपूर्वी अंजू भारतातील पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात गेली होती. तिथे तिने इस्लाम धर्म स्वीकारून नसरुल्लाह या मित्राशी लग्न केले होते. पाकिस्तान सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर ती पुन्हा भारतात जाणार असल्याचे तिच्या पाकिस्तानातील पतीने सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
अंजूच्या पाकिस्तानी पतीने पीटीआयला सांगितले की, "आम्ही इस्लामाबाद गृहमंत्रालयाकडून NOC (ना-हरकत प्रमाणपत्र) ची वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही आधीच अर्ज केला आहे. NOC प्रक्रिया थोडी लांबलचक आहे आणि ती पूर्ण होण्यास वेळ लागतो. वाघा बॉर्डरवरून येण्या-जाण्याची कागदपत्रे पूर्ण होताच अंजू भारतात जाईल, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तान आता तिचे घर आहे, त्यामुळे भारतात मुलांना भेटल्यानंतर ती पाकिस्तानात पुन्हा परतेल," असेही तो म्हणाला.
राजस्थानमधील भिवंडी जिल्ह्यात राहणाऱ्या अरविंदसोबत अंजूचे लग्न झाले होते. त्यांना १५ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे. अंजू तिथे एका खाजगी कंपनीत डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करत होती. २०१९ मध्ये अंजूची पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतातील २९ वर्षीय नसरुल्ला याच्याशी फेसबुकवर मैत्री झाली. काही दिवसांमध्ये या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ऑगस्टमध्ये ती पती अरविंदला जयपूरमध्ये नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगून सीमेपलीकडे गेली होती. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर अंजूने धर्मांतर करून २५ जुलै रोजी नसरुल्लाहशी लग्न केले. ऑगस्टमध्ये पाकिस्तानने अंजूचा व्हिसा एक वर्षाने वाढवला होता.
हेही वाचा :