

पुढारी ऑनलाईन डेस्क
आंध्र प्रदेशातील चित्तूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मद्यधुंद तरुणाने बोकडाऐवजी बोकडाला पकडलेल्या व्यक्तीचा गळा कापला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी खून प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
हे प्रकरण चित्तूरमधील वलासापल्ले येथील आहे. संक्रांतीनिमित्त आरोपी चालपाठी जनावरांचा बळी देत होता. यावेळी 35 वर्षीय सुरेशने बोकड पकडले होते. त्यानंतर अचानक चालपाठीने बोकडाऐवजी सुरेशचा गळा कापला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालपाठी हा दारूच्या नशेत होता. बोकडाऐवजी त्याने सुरेशच्या गळ्यावर शस्त्राने वार केला. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या मदनपल्ले सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी सुरेशला मृत घोषित केले. घटनास्थळावरून चालपथीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत सुरेश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. चलापथीचा सुरेशसोबत जुना वाद होता का, या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत.
देवीच्या प्राचीन मंदिरात दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त यज्ञाचे आयोजन केले जाते. स्थानिक लोकांच्या मते ही प्रथा खूप जुनी आहे. या दिवशी मंदिरात मिष्टान्नाचा नैवेद्य दाखविण्यासाठी बाेकडाचा बळी दिला जाताे. सुरेश आपल्या बाेकडा बळी देण्यासाठी मंदिर परिसरात आला हाेता त्यावेळी हा भयंकर प्रकार घडला.
हेही वाचलं का?