पोलिसांच्या माहितीनूलार, गजानन कवले (५५, रा. शेंदोळा खुर्द, जि : (५५, रा. शेंदोळा खुर्द))) हे एमएच २७ सीटी ४९३० या क्रमांकाच्या दुचाकीने अमरावतीवरून आपल्या गावी जात होते. त्यांच्या दुचाकीवर परिचयातील सतिश चिकटे मागे बसले होते. त्यांची भरधाव दुचाकी सावर्डीजवळील रिलायन्स पेट्रोल पंपनजीकच्या नॅशनल हायवेवर असताना, अचानक चालत्या दुचाकीवर माकडाने उडी घेतली. त्यामुळे ते दोघेही दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. या अपघातात गजानन कवले हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू ६ जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती गुरुवार, ८ जून रोजी नांदगाव पेठ पोलिसांना मिळाली.