खूप सुंदर आहे आकाश आणि श्लोका अंबानी यांच्या मुलीचे नाव, अर्थ आहे खूप खास | पुढारी

खूप सुंदर आहे आकाश आणि श्लोका अंबानी यांच्या मुलीचे नाव, अर्थ आहे खूप खास

पुढारी ऑनलाईन ; उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्‍यांची पत्‍नी श्लोका मेहता यांनी नुकतेच एका गोंडस मुलीला जन्म दिला. अजुनपर्यंत अंबानी कुटुंबाने या नव्या सदस्याच्या नावाचा खुलासा केला नव्हता. मात्र आता या जोडीने आपल्‍या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. ज्‍यामुळे त्‍यांचे चाहते देखील खूश झाले आहेत. चला तर मग जाणून घेवूयात आकाश आणि श्लोका अंबानी यांच्या मुलीचे नाव काय आहे.

आई श्लोका मेहता आणि वडील आकाश अंबानी यांनी ३१ मे दिवशी आपल्‍या जन्मलेल्‍या मुलीचे नाव ‘वेदा’ आकाश अंबानी ठेवलं आहे. या नावाच्या अर्थाबाबत बोलायचे झाल्‍यास वेदा हे संस्‍कृत नाव आहे, ज्‍याचा अर्थ ‘ज्ञान’ असा होतो.

अधिकृत विधानाबाबत बोलायचे तर, त्‍यामध्ये त्‍यांनी म्‍हंटलंय की, ‘भगवान कृष्‍णाची कृपा आणि धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या आशीर्वादाने, पृथ्‍वी आपली छोटी बहीण वेदा आकाश अंबानीच्या जन्माची घोषणा करताना एक्‍साइटेड आहे.

या दांपत्‍याचे पहिले बाळ पृथ्‍वी आकाश अंबानीचा जन्म डिसेंबर २०२० मध्ये झाला होता. तर नीता आकाश अंबानी सांस्‍कृतीक केंद्र (NMACC) च्या भव्य उद्धाटन समारंभा दरम्‍यान श्लोका मेहताच्या दुसऱ्या प्रेग्‍नेंसीची घोषणा केली होती. यानंतर अनेकवेळा त्‍यांना बेबी बंप प्लाँट करताना पाहिले गेले.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांचा हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता सोबत २०१९ मध्ये मुंबईत शाही थाटात विवाह संपन्न झाला होता. या विवाह सोहळ्याला बॉलिवूड मधील दिग्‍गज सिनेकलाकारांनी आपली हजेरी लावली होती.

हेही वाचा : 

Back to top button