Latest

संगीतकार ए .आर .रहमान यांच्या मुलीचा साखरपुडा, कोण आहे तिचा पती?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : जगविख्‍यात संगीतकार ए. आर. रहमान यांची मुलगी खतिजा हिने नववर्ष २०२२ च्या सुरूवातीलाच चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.  खतिजा हिचा  साखरपुडा (इंगेजमेंट)  झाला असून याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे.

ए. आर. रहमान यांची मुलगी खतिजाने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक कोलाज फोटो शेअर करून साखरपुढा पार पडल्याची माहिती दिली. या फोटोत एकीकडे खतिजा आणि तिची होणारा पती रियासदीन शेख मोहम्मद यांचा फोटो आहे. या फोटोत खतिजाने पिंक रंगाचा लेहगा परिधान केल्याने त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत रियासदीन शेख मोहम्मद याचा एक ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो दिसत आहे. तर खतिजाच्या गळ्यात एक वरमाला असून तिने आपल्या चेहऱ्यावर एक मास्क परिधान केला आहे. यातील खास म्हणजे, तिने पिंक रंगाचा लेहग्यांसोबत त्याच रंगाचा मास्क परिधान केला आहे.

हे फोटो शेअर करताना खतिजाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'देवाच्या आशीर्वादाने आमचा साखरपुढा पार पडला, उद्योजक आणि ऑडिओ इंजिनियर रियासदीन शेख मोहम्मद यांच्यासोबत साखरपुडा झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. २९ डिसेंबरला माझ्या वाढदिवशीच आमचा साखरपुडा झाला. यावेळी कुटुंबीय आणि जवळचे काही मोजकेच लोक सहभागी झाले होते.'

कोण आहे खतिजा हिचा पती?

खतिजाची साखरपुडा रियासदीन शेख मोहम्मदसोबत झाला आहे. रियासदीन हा व्यवसायाने ऑडिओ इंजिनियर आहे. दोघांचे हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या कॅमेंन्टस करून दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी खलिजा झाली होती ट्रोल

काही महिन्यांपूर्वी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी खतिजाला तिच्या हिजाबवरून ट्रोल करताना म्हटलं होतं की, 'जेव्हा मी सुशिक्षित लोकांना बुरख्यात पाहते तेव्हा माझा जीव गुदमरतो.' नंतर यावर सडेतोड उत्तर देत 'माझे कपडे पाहून तुमचा जीव गुदमरत असेल तर जा आणि शुद्ध हवा खा. मी माझ्या कपड्यांमध्ये गुदमरत नाही, परंतु, मी अभिमान बाळगते. असे तिने म्हटलं होतं.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT