Latest

वर्णद्वेष : जर्मनी ऑलिम्पिक सायकलिंग संघाच्या संचालकाला घरी पाठवले

backup backup

गेल्या काही वर्षापासून जागतिक स्तरावर वर्णद्वेष करणाऱ्या घटना वाढत आहेत. आता टोकियो ऑलिम्पिकलाही वर्णद्वेषाने गालबोट लागले आहे. यामुळे जर्मनीच्या सायकलिंग संघाच्या क्रीडा संचालकांना ऑलिम्पिकमधून घरचा रस्ता दाखवण्यात आला.

जर्मनी सायकलिंग संघाचे क्रीडा संचालक पेट्रिक मॉस्टेर यांनी गुरुवारी आफ्रिका संघातील पुरुष सायकलस्वारांना उद्देशून वर्णद्वेष पसरवणारी टिप्पणी केली. या प्रकरणावर बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला.

त्यांचे हे वर्णद्वेष पसरवणारे वक्तव्य बुधवारी स्पर्धेआधी टीव्हीवरून थेट प्रक्षेपित झाले होते.

याबाबत बोलताना जर्मन ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अल्फोन्स हौरमन यांनी सांगितले की, 'आम्ही मॉस्टेर यांनी वर्णद्वेषी टिप्पणीबाबत मागितलेली माफी आम्ही ग्राह्य धरतो.

असे असले तरी मॉस्टेर यांनी आपली मर्यादा ओलांडून ऑलिम्पिक मुल्यांची पयमल्ली केली. शुद्ध खेळ, आदर आणि सहिष्णुता याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही.'

दरम्यान जर्मन सायकलस्वार अर्नडट यांने ट्विट करुन आपली भुमिका स्पष्ट केली. त्याने 'मला हे भयानक वाटते. मी हे स्पष्ट करु इच्छितो की माझा अशा प्रकारच्या वर्णद्वेषी वक्तव्याशी कोणताही संबध नाही. जे काही शब्द वापरण्यात आले ते अमान्य आहेत.'

क्रिकेटलाही लागली वर्णद्वेष टिप्पणींची लागण

दरम्यान, क्रीडा जगतात वर्णद्वेष होण्याची घटना नवी नाही.

क्रिकेटमध्येही काही काळापूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेल सामीने त्याला वर्णद्वेषी टिप्पणींचा सामना करावा लागला होता असे सांगितले होते.

त्यामुळे क्रिकेट वर्तुळही वर्णद्वेषाच्या आरोपांनी ढवळून निघाले होते.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : चित्ते पाळून शिकार करायचे कोल्हापूरकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT