लखीमपूर खिरी कडे कूच करणाऱ्या पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशात जाणाऱ्या हजारो शेतकरी आणि कार्यकर्त्यांना बॉर्डरवर सहारनपूर येथे रोखण्यात आले. येथे काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी आणि पोलिसात संघर्ष सुरू असून येथे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसचारात कारवाई न झाल्याने आक्रमक झालेल्या काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. हिंसाचारानंतर दुसऱ्याच दिवशी तेथे जाणाऱ्या प्रियांका गांधी यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर राहुल गांधी यांना लखनौ विमानतळावर रोखले. त्यांच्यासोबत छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांनाही रोखले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांना परवानगी दिली.
उत्तर प्रदेश सरकार सर्वच पातळ्यांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत प्रियांका आणि राहुल गांधी यांनी हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी नवज्योत सिद्धू यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते उत्तरप्रदेशकडे जायला निघाले. उत्तर प्रदेशच्या सीमेवर सहारनपूर येथे बॅरिकेटस आणि ट्रॉली लावून हा ताफा अडविण्यात आला ( लखीमपूर नवज्योत सिद्धू ).
यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राज्यता १४४ कलम लागू केल्याने ताफा जाऊ देणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र, सिद्धू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कार्यकर्ते प्रचंड आक्रकम झाले.
त्यांची पोलिसांशी हमरीतुमरी झाली. त्यानंतर बॅरिकेटस आणि ट्रॉली हटवून ताफा पुढे सरकला (लखीमपूर नवज्योत सिद्धू) पोलिसांनाही त्यांच्या आक्रमकतेपुढे माघार घ्यावी लागली. तरीही अधिकचा फौजफाटा तैनात करून हा ताफा रोखण्याचे नियोजन पोलिस करत सिद्धू यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना अटक केली असल्याचे वृत्त एका टीव्ही चॅनेलने दिले आहे.
या प्रकरणातील प्रमुख संशयित केंद्रीय गृहराज्यंमत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला ताब्यात घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी ठिकठिकाणी छापा टाकला. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी नोटीस देऊन चौकशीसाठी बोलविले आहे.