सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र ) 
Latest

मृत्यूदंड प्रकरणांवर ७ सप्टेंबरपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मृत्यूदंड प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात ७ सप्टेंबर पासून सुनावणी घेण्यात येणार आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने अधिसूचना काढली आहे.

अधिसूचनेनूसार हे सर्व प्रकरणे तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमक्ष यादीबद्ध करण्यात आले आहे.

या यादीत चार पुनर्विचार याचिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

२००० मध्ये लाल किल्ल्यावर मो. आरिफ उर्फ अशफाकने केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते.

याप्रकरणी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

अशफाकने यासंबंधी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

अशफाकसह चेतनराम चौधरी-जितेंद्र उर्फ जीतू नयनसिंह गहलोत, सुंदरराजन तसेच मोफिल खान यांच्या याचिकांचा देखील विचार केला जाणार आहे.

पुनर्विचार याचिकावर विचार करण्यात यावा, अशी मागणी करिता अशफाक, सुंदर तसेच मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या इतर दोषींनी रिट याचिका दाखल केली होती.

याचिकेची सुनावणी किमान तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमक्ष करण्यात यावी, मृत्युदंडाच्या प्रकरणातील रिव्ह्यू पिटीशनची सुनावणी खुल्या न्यायालयात करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

हे सर्व प्रकरणे खुल्या न्यायालयात सुनावणी करिता घेण्याचे न्यायालयाने मान्य केल्याने आता त्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.

मृत्यूदंड प्रकरणांवर होणार सुनावणी

  • नारायण चेनराम चौधरी, जितेंद्र उर्फ जीतू नयनसिंह गहलोत प्रकरण
    उभय आरोपींनी एका गर्भवती महिला आणि दोन लहान मुलांसह पाच महिलांच्या हत्येच्या आरोपखाली न्यायालयाने दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
  • सुंदर उर्फ सुंदरराजन
    सुंदरला सात वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि हत्येकरिता दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
  • मोफिल खान
    मोफिल खान ला सहा जनांच्या हत्येकरिता दोषी ठरवत मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • अनोखीलाल
    अनोखीलाल ला मार्च २०१३ मध्ये नऊ वर्षाच्या एका अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचा: 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT