नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : माजी राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या प्रवेशाने काँग्रेसला बळकटी मिळेल असे नाना पटोले म्हणाले
यावेळी नाना पटोले म्हणाले की, मविआ सरकार आल्यापासून काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असून हे काँग्रेस पक्ष व सरकारवरचा विश्वास दृढ करणारे आहे.
शिंदे यांच्या प्रवेशाने हिंगणघाट व वर्धा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होईल असे पटोले म्हणाले.
याचबरोबर पटोले यांनी शिंदे यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
अजूनही विविध पक्षातील नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत असेही पटोले म्हणाले.
या पक्ष प्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप आदी उपस्थित होते.
हे ही पाहा :