पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश मध्ये क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली आहे. सरपंच पतीची कॉलर पकडली म्हणून एका युवकाचे दोन्ही हात तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने मध्य प्रदेश मध्ये खळबळ माजली आहे.
अधिक वाचा
मध्य प्रदेशमधील होशंगाबाद जिल्ह्यातील चोराहेट गावातील एका युवकाबरोबर सरपंच पतीचा वाद झाला. या वेळी युवकाने सरपंच पतीची कॉलर पकडली. यावेळी सरपंच पती व समर्थकांनी युवकाचे दोन्ही हात तोडले.
सरपंच पती हा गुन्हेगारी प्रवृतीचा आहे. त्याचा गावातील युवकाबरोबर वाद झाला. युवकाने त्याला जाब विचारत त्याच्या शर्टची कॉलर पकडली हाेती.
याचा राग त्याच्या मनात होता. त्याने संबंधित युवकास भाजी मंडईत बोलवले. येथे त्याच्या समर्थकांनी त्याला बेदम मारहाण केली. धारदार शस्त्रांनी त्याचे दोन हात तोडले.
अधिक वाचा
गंभीर जखमी झालेल्या युवकाला होशंगाबाद रुग्णालयात दाखल केले आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत, अशी माहिती स्थानिक पाेलिसांनी दिली. या घटनेने हिशंगाबाद जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
युवकानचे सरपंच पत्तीसोबत जुनावा वाद होता. यातून दोघांमध्ये वाद होत होता. मात्र केवळ कॉलर पकडली म्हणून युवकाचे हात तोडण्यात आल्याच्या घटनेचा तीव्र निषेध होत आहे.
याप्रकरणातील आराेपींवर कठाेर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
हेही वाचलं का ?