पुढारी ऑनलाईन डेस्क; ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या आखाड्यात भारताचा कुस्तिपटू रवी कुमार दहिया याने विजयी सलामी दिली. रवी कुमार दहिया याने फ्रीस्टाइलच्या ५७ किलो वजनी गटात कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरोस याला हरवले. यामुळे तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
कुस्तीच्या आखाड्यात आज अंशू मलिक, दीपक पुनिया उतरत आहेत.
दरम्यान, सेमीफायनलमध्ये पोहोचलेली भारताची बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन आज बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहे. तिने भारताचे पदक निश्चित केले आहे. सेमीफायनलमध्ये लव्हलिनाचा सामना बुधवारी सकाळी ११ वाजता तुर्कीची बुसेनाज सुरमेनेली हिच्याशी होणार आहे.
लव्हलिनाचे कांस्य पदक निश्चित आहे. पण तिने सेमीफायनल जिंकल्यास ती सुवर्ण कामगिरीही करु शकते. तिच्या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
तर सेमीफायनलमध्ये भारतीय महिला हॉकी संघ दुपारी ३.३० अर्जेंटिनाशी भिडणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज बुधवारी (दि.०४) झालेल्या अ गटातील पात्रता फेरीत नीरजने जोरदार कामगिरी केली.
यामुळे तो अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने केलेल्या कामगिरीनुसार ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार तो थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे.
नीरज चोप्राने पात्रता फेरीत तब्बल ८६.६५ मीटर इतका लांब भाला फेकला. नीरजने पहिल्या नियमानुसार लांब भाला फेकल्याने त्याचे अंतिम फेरीत स्थान पक्क झाले आहे.
युवा भारतीय पैलवान सोनम मलिकला मंगळवारी ऑलिम्पिक पदार्पण करताना महिला 62 किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीतच मंगोलियाच्या बोलोरतूया खुरेलखु विरुद्ध पराभूत व्हावे लागले.
19 वर्षीय सोनमने दोन पुश आऊट गुण मिळवत 2-0 अशी आघाडी मिळवली होती; पण आशियाई चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेत्या खुरेलखुने भारतीय पैलवानाला पाडून दोन गुण मिळवत बरोबरी साधली. हे गुण तिने सामना संपण्यास 35 सेकंद असताना मिळवले.
सामन्यातील गुण बरोबरीत राहिले. तर, शेवटचे गुण मंगोलियाच्या खेळाडूने मिळवल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले.
मंगोलियाची पैलवान पुढच्या फेरीत बुल्गारियाच्या तैयब मुस्तफाकडून पराभूत झाल्याने भारतीय मल्ल स्पर्धेबाहेर गेली.
हे ही वाचा :