मुंबई ; पुढारी ऑनलाईन: पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
राज कुंद्राला पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणी २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती. याची मुदत आज मंगळवारी (दि.२७) रोजी संपली होती. यानंतर राजला किला न्यायालयात हजर करण्यात आले.
अधिक वाचा
राज कुंद्राला आणखी काही काळ चौकशी करण्यासाठी किला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली.
याआधी राज कुंद्राच्या कोठडीत ७ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केली होती.
अधिक वाचा
राज कुंद्राला १९ जुलै रोजी २ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवून ॲप्सवर प्रदर्शित करण्याचा आरोप लावला आहे.
अधिक वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. राज व्यतिरिक्त आणखीही काही जणांची पोलिस चौकशी करत आहेत. या दरम्यान राज यांना न्यायालयात हजर केले असता २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती.
हेही वाचलंत का?